नवी दिल्ली दि.१५- स्वीडीश लक्झरी कार कंपनी व्होल्व्होने शुक्रवारी त्यांची व्ही-४० क्रॉस कंट्री ही लक्झरी कार भारतात सादर केली असून तिची किंमत आहे २८ .५ लाख रूपये. भारतात या वर्षात १२०० गाड्या विकण्याचे उदिष्ट्य कंपनीने ठेवले आहे.

व्होल्व्हो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक टॉमस एर्नबर्ग या संबंधी माहिती देताना म्हणाले की आम्ही वाहन विम्यासाठी बजाज एलियान्झ यांच्याशी सहकार्य करार केला आहे. आत्ताच आमच्या व्ही ४० मॉडेलच्या ७० गाड्या बुक झाल्या आहेत. त्याचबरोबर कंपनी एस ६० आणि सी ६० ही दोन नवीन मॉडेल्स आक्टोबरमध्ये लाँच करणार आहे.
गेल्या वर्षी कंपनीने भारतात ८०० गाड्या विकल्या होत्या. यंदाच्या वर्षात ही संख्या १२०० वर नेण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून ते म्हणाले की सध्या तरी या गाड्या आयातच केल्या जाणार आहेत. पहिल्या तिमाहीत कंपनीने २७६ गाड्या विकल्या असून हे प्रमाण गतवर्षाच्या तुलनेत १४० टक्कयांनी अधिक आहे. व्ही -४० या मॉडेलला बीएमडब्ल्यू एक्स १ शी स्पर्धा करावी लागणार आहे कारण त्यांच्या गाडीच्या किमतीही २७ ते ३२ लाख रूपयांदरम्यान आहेत.
व्ही -४० ला डिझेल इंजिन असून ती लिटरला १६ किमीचे अॅव्हरेज देईल असा कंपनीचा दावा आहे. भारतात २०२० पर्यंत २० हजार गाड्या विकण्याचे कंपनीचे ध्येय असून त्यानंतर भारतातच या गाड्या असेंबल करण्याचाही विचार केला जाणार आहे असेही टॉमस यांनी सांगितले. कंपनीची एक्ससी ९०, एक्ससी ६०, एस ८० व एस ६० अशी चार मॉडेल्स सध्या भारतात उपलब्ध आहेत.