बीजिंग, दि.१३ – भारतात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाची चर्चा झाली. हा प्रकल्प राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली. मात्र, पुढे काय झालं ते राज्यकर्त्यांनाच माहित. मात्र, चीनने एक पाऊल पुढे टाकत नदीजोड प्रकल्पाचे उद्घाटन केलं असल्याचे वृत्त आहे.
चीनमध्ये नदीजोड प्रकल्पाची सुरूवात
चीनमधील यांग्त्जे आणि पीली नदी एकमेकींना जोण्यात येणार आहे. यामुळे चीनची पाच दशकातील जुनी योजना प्रत्यक्षात अमलात आली आहे. चीनच्या दक्षिण-उत्तर मार्ग परिवर्तन योजनेच्या कामानुसार यांग्त्जे नदीचे पाणी खालील भागातील पीली नदीच्या खालील भागात झिरपत आहे. यांग्त्जे नदी ही जगातील सर्वाधिक लांबीची तिसरी नदी आहे. तर याच प्रांतातील पीली नदी दुसर्याा क्रमांची लांब नदी आहे.
दक्षिण-उत्तर जलमार्ग परिवर्तन योजना सर्वात आधी चीनी नेता माओ जेदोंग यांनी १९५२ मध्ये आखली. आता ५० वर्षांनंतर या योजनेला मूर्तस्वरूप मिळाले आहे. २००२ मध्ये ही योजना प्रत्यक्षात आणण्यास सरकारने मंजुरी दिली.
