आक्टोबरमध्ये पाटण्यात गर्जणार मोदी

पटना दि.१० – भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचार प्रमुखपदाची माळ गळ्यात पडलेले गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी २७ आक्टोबरला पाटणा येथे होणार्याम पक्षाच्या हुंकार रॅलीत भाषण करणार आहेत. २०१४ साली होत असलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने मोदींना प्रचाराची धुरा सोपविल्यानंतर संपूर्ण देशातच मोदींचे झंझावाती दौरे सुरू होतील असे सांगितले जात आहे.

बिहारमधील नितिशकुमार सरकार मोदींच्या विरोधात आहे. बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष मंगल पांडेय यांनी मोदींच्या प्रचारप्रमुख पदी झालेल्या निवडीने सर्व देशभर संदेश गेला असून कार्यकर्तेही उत्साहाने प्रेरित झाल्याचे सांगितले आणि २७ आक्टोबरला पाटण्यात होत असलेल्या पक्षाच्या हुंकार रॅलीचे आमंत्रण मोदींनी स्वीकारले असल्याचेही जाहीर केले आहे.