डिंपल कपाडिया झाली ५५ वर्षाची

काही वर्षपूर्वी अभिनयाने बॉलीवुडवर छाप पडणारी अभिनेत्री डिंपल कपाडियाचा शनिवारी ५५ वर्षाची झाली. ८ जून १९५७ रोजी गुजराती परिवारात जन्मलेल्या डिंपलने फिल्मी करियरची सुरुवात ‘बॉबी’ या सिनेमापासून केली १९७3 साली प्रदर्शित झालेल्या ‘बाबी’ या सिनेमातून डिंपल कपाडियाने जबरदस्त लोकप्रियता मिळवली. ‘बॉबी’ या सफल सिनामानंतर डिंपल कपाडियाने अभिनेता राजेश खन्ना सोबत लग्न केले. त्यानंतर तिने सिनेइंडस्ट्री सोडली होती.

त्यानंतर १९८४ साली प्रदर्शित झालेल्या जख्मी शेर या सिनेमातून डिंपल कपाडिय़ाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमबैक केले होते. ‘सागर’ या सिनेमानंतर डिंपल कपाडिय़ाची इमेज एक बोल्ड अभिनेत्री झाली होती. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या ‘जख्मी औरत’ या सिनेमात डिंपल कपाडियाची महत्वपूर्ण भुमिका केली होती. त्यामध्ये तिने महिला इंस्पेक्टरचा रोल केला होता.

१९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘लेकिन’ या सिनेमा डिंपलसाठी महत्वपूर्ण ठरला. हा सिनेमा पाश्र्वगायिक लता मंगेशकरने निर्मित केला होता. ‘यारा सीली सीली’ गीत तिने गायिले होते. हे गाणे खूपच लोकप्रिय झाले. डिंपल कपाडियाला आता पर्यंत तीनवेळा फिल्म फेयर पुरस्कार मिळाला आहे. डिम्पलने सिने कैरियरमध्ये ७५ सिनेमात अभिनय केला आहे. डिंपलचे अर्जुन, एतबार, काश, राम लखन, बीस साल बाद, बंटबारा, प्रहार.अजूबा, नरसिम्हा, गर्दिश, क्रांतिवीर, दिल चाहता है, बीइग सायरस, कॉकटेल, पटियाला हाउस, दबंग हे सिनेमे हिट ठरले आहेत.