पुणे,दि.4 : गेले वर्षभर तहानेला महाराष्ट्र आज दोन दिवस नेहेमीच्या वेळेआधी आलेल्या मोसमी पावसाने सुखावला . महाराष्ट्रातील अठरा जिल्हे यावर्षी अपुर्या पावसाने त्रस्त होते. मोसमी पाउस लवकर येत असल्याचा निरोप जणू वळवाच्या पावसाने गेल्या तीन दिवसापासून आणला होता. गेला महिनाभर विक्रमी तपमान दिेलेल्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसाचा पाउस लोकांना आधार वाटत होता. कालच पुण्याच्या वेधशाळेच्या संचालिका डॉ मेधा राखोले यांनी पाउस लवकर येत असल्याची कल्पनाही दिली होती. त्यानुसार कालच्या एका दिवसात सारा कर्नाटक व काहीसा आंध्र प्रदेश ओलांडून मोसमी पावसाने महाराष्ट्रात प्रवेश केला. तळ कोकणात आज सकाळीच न पावसाला आरंभ झाला. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हयात दुपारी पावसास आरंभ झाला. पुणे शहरात सायंकाळी पाचच्या सुमारास जोराच्या गडगडाटासह पावसास आरंभ झाला. रात्री उशीरापर्यंत पावसाची रिमझिम सुरु होती.
मोसमी पावसाच्या आगमनाने सुखावला महाराष्ट्र
गेल्या सहा महिन्यात केवळ दुष्काळी कामातून आठ टीएमसी म्हणजे पुणे शहराला सहा महिने पुरेल येवढे पाणी साठवण्याची कामे झाली अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यंानी दिली असली तरी गेल्या पाच वर्षात सत्तर हजार कोटी रुपये खर्च करूनही एक थेंबही पाणी अडविले न गेल्याने महाराष्ट्रावर गेल्या पन्नास वर्षात झाली नव्हती अशी पाण्याची समस्या निर्माण झाली. जगातील कोणत्याही भूभागापेक्षा ज्या भागात चांगला पाउस होतो त्या ठिकाणी धरणाची कामे अचानक महाग झाल्याने सारा पैसा केवळ वहानखर्च व देखभाल खर्चातच गेला.
