
कार्तिक फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि के. सुब्रमनीयम यांचा आगामी मराठी चित्रपट ‘भुताचा हनिमून’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेता भरत जाधव मुख्य नायकाच्या भूमिकेत असून तो पहिल्यांदाच रोमँटिक लुक मध्ये तो आपल्याला दिसेल. साधा सरळ शिक्षक व गावाच्या भल्यासाठी धडपडणारा माणूस अशा भरतच्या वेगळ्या छटा या चित्रपटात
आपल्याला पाहण्यासाठी मिळतील. त्याच्या जोडीला रुचिता जाधव आहे. याशिवाय विजय चव्हाण, संतोष मयेकर, जयराज नायर, मधु कांबीकर सह संदीप पाठकची विशेष भूमिका आहे. लक्ष्मिकांत विसापुते लेखक तर दिग्दर्शन राज मोहिते आहेत.
