रायपूर: गेल्या आठवड्यात छत्तीसगडमध्ये ३० निष्पापांचा बळी गेला होता. या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे. एनआयएन सादर केलेल्या १४ पानी प्राथमिक अहवालात नक्षलींच्या संपर्कात काँग्रेसचेच चार नेते असल्याचे उघडकीस आले आहे. चार काँग्रेसी नेत्यांच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डची तपासणी केल्यानंतर एनआयएने या काँग्रेसी नेत्यांच्या संबंधाचा दावा केला आहे. या सर्व प्रकारामुळे खळबळ माजली आहे.
आठ दिवसापूर्वी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात काँग्रेसची परिवर्तन रॅली सुरु असताना, रॅलीचा मार्ग अचानक बदलला गेला. आणि या रॅलीवर नक्षल्यांनी अमानुषपणे हल्ला केला. अचानक बदललेल्या रॅलीचा मार्ग नक्षल्यांना कसा समजला, असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होऊ लागला होता.
त्यानंतर काही काँग्रेसी नेत्यांवर नक्षल्यांना माहिती पुरवल्याचा आरोप होऊ लागला. मात्र नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावले. एनआयएन सादर केलेल्या १४ पानी प्राथमिक अहवालात नक्षलींच्या संपर्कात काँग्रेसचेच चार नेते असल्याचे उघडकीस आले आहे. चार काँग्रेसी नेत्यांच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डची तपासणी केल्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या नक्षल्यांशी असलेल्या संबंधांना पुष्टी मिळाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.