काही दिवसापूर्वीच मुंबई मधील सन्मुखानन्द हॉल मध्ये ‘शॉर्टकट रोमिया’ या सिनेमाच्या प्रमोशनल इवेंटचे आयोजन करण्यात आले होते. सुसी गणेशनने दिग्दर्शीत केलेल्या ‘शॉर्टकट रोमिया’ या सिनेमात अभिनेता नील नितिन मुकेश, अभिनेत्री अमीषा पटेल आणि पूजा गुप्ता लीड रोल करीत आहेत. या सिनेमातील रोल साठी अमीषाने खूपच मेहनत घेतली असून तिने तिचे वजन पाच किलोने कमी केले आहे. त्यामुळे आता अमीषा खूपच स्लीम दिसत आहे.
‘शॉर्टकट रोमिया’ या सिनेमाच्या प्रमोशनल इवेंटमध्ये नील नितिन मुकेश, अमीषा पटेल, श्यामक डावर आणि दिग्दर्शक सुसी गणेशन उपस्थित होते. यावेळी श्यामक डावर द्वारा कोरियोग्राफ करण्यात आलेल्या डान्स परफॉर्मेंसचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नील नितिन मुकेश व अमीषा ही जोडी या गाण्यावर थिरकली. त्यासोबतच या दोघांनी स्टेजवर खूप मस्ती केली.
काही दिवसापूर्वीच अभिनेत्री आमिषाने अभिनय करण्याऐवजी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले होते. मात्र आता पुन्हा एकदा ती अभिनय करताना दिसणार आहे. या सिनेमात अमीषा पटेल एक नैगेटिव रोल करीत आहे. त्यासाठीच तिने वजन कमी केले आहे. ‘शार्टकट रोमियो’ हा सिनेमा २१ जून रोजी रिलीज होणार आहे.