पुन्हा एकदा बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या अभिनयाचा जादू प्रेक्षकावर चांगलाच चालला आहे. माधुरीच्या जवानी है दीवानी.. या सिनेमातील आयटम सॉंग ‘घाघरा’ हे चांगलेच हिट झाले आहे. या गाण्यामुळे माधुरीचे सर्वचजन दीवाने झाले आहेत. आगामी काळात माधुरीचा ‘डेढ़ इश्कियां’ हा सिनेमा येत आहे. त्या मध्ये माधुरी अभिनय सम्राट नासिरूद्दीन शाहसोबत हॉट आणि बोल्ड सीन करणार असल्याची चर्चा आहे.
‘डेढ़ इश्कियां’ या सिनेमातील दूसरी जोड़ी अरशद वारसी आणि हुमा कुरैशी यांच्यामध्ये हॉट आणि इंटिमेंट सिन्स आहेत. माधुरी सारख्या स्टारला या सिनेमात हॉट आणि बोल्ड अभिनय करण्याची काय गरज आहे अशी चर्चा सध्या रंगली आहे. डेढ़ इश्कियां, इश्कियां सिनेमाचा सीक्वेल आहे. ज्यामध्ये अभिनेत्री विद्या बालनने बोल्ड भूमिका केली होती. तिने या सिनेमात नासिर साहब आणि अरशद या दोघांसोबत हॉट सींस केले होते.
‘डेढ़ इश्कियां’ या सिनेमात माधुरीसोबत कत्थक सम्राट बिरजू जी महाराज कोरियोग्राफ करणार आहे. त्याने माधुरीची तुलना लीजैंड अभिनेत्री वहीदा रहमान सोबत केली आहे. ‘डेढ़ इश्कियां’ या सिनेमाचे निर्माता विशाल भारद्वाज असून त्यांनी या सिनेमासाठी एक गाणे लिहले आहे. त्या गाण्यावर या सिनेमात माधुरी पुन्हा एकदा मुजरा करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी जानेवारी महिन्यात रिलीज होणार आहे.