
नवी दिल्ली दि.३१ – सॅमसंग ने त्यांच्या स्मार्टफोन बाबत ग्राहकांची उत्सुकता नेहमीच चाळविली आहे. त्यांच्या गॅलॅक्सी सिरीजला ग्राहकांकडून जो प्रतिसाद मिळतो आहे तो पाहता ही कोरियन कंपनी आता कोणते नवे उत्पादन बाजारात घेऊन येणार याची चर्चा नेहमीच सुरू असते. गॅलॅक्सी एस फोर मिनी हे उत्पादनही याला अपवाद नाही. अनेक दिवस चर्चा आणि अंदाजांना उधाण आले असताना कंपनीने आता हा फोन लंडन येथील कार्यक्रमात २० जून रोजी सादर केला जात असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे.
