जपानला मागे टाकून भारत तिसरी आर्थिक महासत्ता बनणार

अमेरिका आणि चीननंतर भारत येत्या कांही वर्षात जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनेल असा अंदाज पॅरिस मधील ऑरगानझेशन ऑफ इकॉनॉमिक कार्पोरेशन अॅन्ड डेव्हलपमेंट संस्थेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. सध्या तिसर्याम स्थानावर जपान असले तरी भारत लवकरच जपानला मागे सारून ही जागा घेईल असे या अहवालात म्हटले गेले आहे.

या अहवालात नोंदविण्यात आलेल्या निरीक्षणांनुसार आगामी कांही वर्षात अमेरिकाही जगातील आर्थिक महासत्तेचे पहिल्या नंबरचे स्थान गमावणार आहे आणि त्याजागी चीन मुसंडी मारणार आहे. त्याच काळात भारत जपानला मागे टाकून तिसरे स्थान घेईल. २०२० पर्यंत चीनचा ग्रोथ रेट सर्वाधिक असेल तसेच आत्तापासून २०६० सालापर्यंतच्या काळात भारतातील दरडोई उत्पन्नात आत्ताच्या तुलनेत आठ पट वाढ होणार आहे असाही अंदाज यात दिला गेला आहे. चीन आणि इंडोनेशियात हाच दर सहापट होईल.

ओइसीडीने वर्तविलेल्या अंदाजानुसार भारताची नोव्हेबरपर्यंतची आर्थिक वाढ ५.९ टक्कयांवर असेल तर पुढच्या वर्षात म्हणजे २०१४ मध्ये ती ६.७ वर जाण्याची शक्यता आहे. युरो चलन वापरणार्याह देशात जीडीपी ०.६ टक्कयांनी यंदा कमी नोंदविला जाईल तर पुढच्या वर्षात तो आणखी घसरून १.१ टक्यांनी कमी होईल असेही या संस्थेतील तज्ञांचे म्हणणे आहे.