
वॉशिंग्टन, दि.३० – कॅलिफोर्निया व मिसुरी या राज्यांनी केलेल्या करावाईनुसार तसेच राज्य व केंद्राच्या वेगवेगळ्या पर्यावरणविषयक कायद्यांचा भंग केल्यामुळे वॉलमार्ट कंपनीला एकूण ११० दशलक्ष डॉलर्सचा दंड भरावा लागेल, असे अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाने सांगितले. पर्यावरणाला बाधा होईल अशा पद्धतीने किटकनाशकांची विल्हेवाट लावण्याच्या गुन्ह्यांसाठी वॉलमार्टने ११० दशलक्ष डॉलर रक्कम नुकसान भरपाई भरण्याचे मान्य केले आहे. अमेरिकेतील रिटेलच्या दुकानांमध्ये खते व इतर धोकादायक रसायनांची विल्हेवाट योग्य पद्धतीने न लावल्यामुळे न्याय मंत्रालयाने कंपनीला दंड भरण्याचे निर्देश दिले होते.
