लोकसंख्या हा जगाच्या दृष्टीने महत्वाचा विषय असला तरी प्रत्येक देशाच्या दृष्टीने त्याचे स्वरुप बदलत असते. बहुतेक आशियायी देशात वाढती लोकसंख्या ही समस्या आहे तर युरोपीय देशात कमी लोकसं‘या वाढवायची कशी ही समस्या आहे. जर्मनीची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्या संदर्भात त्या देशाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तेथील रोमन कॅथलिक पंथाचे प्रमुख कार्डिनल जोचीम मेस्नर यांनी ‘जर्मनीतील माता बनण्याची क्षमता असलेल्या प्रत्येक महिलेने चार अपत्यांना जन्म द्यावा, असे केलेले आवाहन जगभर चर्चेचा विषय ठरला आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर म्हणजे राष्ट्रप्रमुख अॅन्जेला मार्कर यांनी त्या देशात अन्य देशातील लोकंानी यावे व तेथील निवासी व्हावे, अशी जी भूमिका घेतली आहे, त्यावर कार्डिनल जोचीम मेस्नर यांनी टीका केली आहे. गेल्या दहा वर्षात युरोप व अमेरिका या खंडातील अनेक देशांना कमी होणारी लोकसं‘या ही एक गंभीर समस्या भेडसावत आहे.
गेल्या महिन्यात युरोप व अमेरिका या देशांचे गेल्या दहा वर्षाचे जनगणनेचे अहवाल प्रकाशात आले व त्यात त्या त्या देशातील ख्रिश्चन लोकसख्या प्रचंड प्रमाणात कोसळत आहे व मुस्लिम लोकसं‘ख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे, अशी जी माहिती उजेडात आली आहे, त्याची पार्वभूमी आहे. त्या अहवालाने युरोप व अमेरिकेतील राजकीय नेतृत्व हादरले आहे. त्याचे कारण असे की, गेल्या दहा वर्षात युरोप व अमेरिकेतील मुस्लिम लोकसख्या दुप्पट झाली आहे तर गेल्या वीस वर्षात रशियातील मुस्लिम लोकसंख्या तिप्पट झाली आहे. युरोप अमेरिकेची एका धर्मियांची संख्या दुप्पट होणे व रशियाची तीनपट होणे याला त्या त्या देशातील महत्वाचा संदर्भ आहे. तो असा की, अमेरिकेत दि.11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉकर्ंमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे दोन टॉवर ओसामा बिन लादेनच्या हल्ल्यात पडले. त्यात चार हजार लोक ठार झाले. त्यातील प्रचंड हानीपेक्षाही एका महासत्तेला एखादी दहशतवादी छोटी संघटनाही आव्हान देवू शकते, अशी झालेली मानसिक हानी फार मोठी होती. त्यानंतर त्यांनी मुस्लिम समाजातील प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवली होती.
अमेरिकेतीलही प्रत्येक मुस्लिम हा देखील तेथील अन्य नागरिकाप्रमाणे प्रथम अमेरिकेसाठी ‘जगणारा आणि मरणारा’ नागरीक आहे, अशी भूमिका घेतली होती. तरीही त्या नंतरच्या दहा वर्षात तेथील मुस्लिमांमधील फरक असा की, तेथे त्यांची लोकसंख्या दुप्पट झाली आहे. त्याच काळात युरोप व रशियातीलही स्थिती भिन्न नव्हती. रशियातील याच विषयाला स्थानिक संदर्भ असा की, अमेरिकेच्या दृष्टीने जे महत्व 9।11च्या हल्ल्याला आहे त्याही पेक्षा रशियाच्या दृष्टीने महत्वाची घटना म्हणजे 1989 साली तेथील महासत्ता मानल्या जाणार्या सोव्हिएत युनियनचे पतन होवून तेथे अनेक देश नव्याने जन्माला आले. त्यानंतर रशियाची लोकसंख्या तर कमी होवू लागलीच आहे. पण त्यातही तेथील ख्रिश्चन ऑर्थाडॉक्स पंथ या प्रमुख धर्मश्रद्धा असलेल्यांची संख्या अजून कमी होत आहे. नव्याने सुरु झालेल्या लोकशाही प्रकि‘येत कसे जमवून घ्यायचे असा विचार तेथील राजकारणी करत असताना तेथील राज्यकर्त्यांच्या लक्षात आलेली बाब म्हणजे गेल्या चोवीस वर्षात तेथील मुस्लिमांची संख्या‘या तीनपट झाली आहे. जगातील आजपर्यंतच्या मुस्लिमांची सं‘या वाढण्याच्या जगातील प्रमाणापेक्षा युरोप व अमेरिकेतील हे वाढीचे प्रमाण फारच मोठे आहे. त्यामुळे यावर कॅथॉलिक धर्मगुरु चिंतीत झाले आहेत.
चार महिन्यापूर्वी रोमन कॅथलिक पंथाचे सारे आचार्य रोमयेथे जमले असताना यावर गंभीर विचार झाला, त्यात जी चर्चा झाली त्याचे काही पडसात जर्मनीचे कार्डिनल जोचीम मेस्नर यांच्या बोलण्यात आले आहेत. त्यांचे म्हणणे असे की, सार्या युरोपमध्ये जर्मनीची समस्या अजून उग‘ आहे म्हणजे तेथील लोकसंख्या अन्य देशांच्या तुलनेत अधिक कमी होत आहे. तेथील स्टटगार्टर झिटुंग या दैनिकाला मुलाखत देताना 79 वर्षाचे कार्डिनल जोचीम मेस्नर म्हणाले की, पुढील तीस पस्तीस वर्षात जर्मनीची सध्याची आठ कोटी तीस लाख येवढी असणारी लोकसंख्या सात कोटीवर येण्याची शक्यता आहे.‘आपण जगात एक मरणारा समाज ठरत आहोत’. त्यासाठी मुलांना जन्म देण्याची क्षमता असणार्या प्रत्येक महिलेने घरी थांबून तीन ते चार मुलांना जन्म देण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार व जनता त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
याबाबत सरकारचे म्हणणे असे की, देशातील लोकसंख्या ही नव्या मुलांच्या जन्माने सुटावी अशीच सरकारची इच्छा आहे, त्यादृष्टीने सरकारने प्रयत्न सुरु ठेवले आहेत. नव्याने जन्म देणार्या मातांना अनेक पद्धतीचे अनुदान दिले जात असते, पण येथे गर्भपाताचेच प्रमाण वाढते आहे पण नव्या मुलांच्या जन्माचे प्रमाण तेथे अजून वाढू शकलेले नाही. त्यांनी अजून एक गंभीर समस्या सांगितली की, पंधरा वर्षापूर्वीची पन्नास वर्षे जर्मनीच्या निम्म्या भागात दुसर्या महायुद्धानंतर विभाजनामुळे कम्युनिष्टांचे सरकार होते. त्या भागात व त्या काळात लोकसंख्या अधिक कमी झाली. त्या काळात ज्या महिलांनी ‘घरी राहून अधिक मुलांना जन्म दिला’ त्यांना ‘वेड्या’ म्हणण्यात आले.
तेथील काही महिलांनी मात्र कार्डिनल जोचीम यांच्यावर टीका केली आहे. त्यांचे म्हणणे असे की, 79 वयाच्या कार्डिनल महोदयांना वाढत्या वयानुसार शहाणपण आलेलेच नाही. सध्या युरोपात मुले जन्मास घालण्याचा कार्यक‘म हा सर्वात महत्वाचा मुद्दा नसून युरोप व अमेरिका या खंडातील बँका मोठ्या प्रमाणावर कोसळत आहेत, अर्थव्यवस्था कोलमडत आहे. ती अर्थव्यवस्था विकसित करणे हा सर्वात महत्वाचा कार्यक‘म आहे. तो सोडून मुले जन्मास घालणे याला महत्व देणे योग्य नाही. तरीही युरोपातील बिशप, आर्चबिशप व कार्डिनल यांचे म्हणणे असे की, तरीही त्या देशातील लोकसं‘या ही नव्या पिढीच्या स्वागताने वाढणे आवश्यक आहे. काही महिलांनी जरी कार्डिनलच्या विरोधात प्रतिकि‘या व्यक्त केली असली तरी युरोपीय समाजात आणि त्यातही ख्रिश्चन पंथात बिशप व कार्डिनल यांचे स्थान मोठे असते. त्यांना पोलीस अधिकारी किंवा न्यायसंस्था यांच्यासारखे काही अधिकार असतात. त्यामुळे सार्या युरोपभर कार्डिनल जोचम मेस्नर यांच्या विधानाची गंभीर दखल घेतली आहे.