हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांच्या मुलांनी बॉलिवुडमध्ये झळकणे नविन राहिले नाही. तोच कित्ता गिरवत मराठी स्टार्सची मुलेही चित्रपटांकडे वळत आहेत. आता त्यात आणखी एका नावाची भर पडली आहे ती म्हणजे सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची ‘एकुलती एक’लेक श्रिया पिळगावकर. ’एकुलती एक’ ही कथा आहे पार्श्वगायक अरुण देशपांडे ( सचिन) आणि स्वरा (श्रिया पिळगावकर) या बाप – लेकीच्या नात्याची. अरूण देशपांडे प्रसिद्धीच्या झोतात असलेला गायक असला तरी एकटाच आहे. सतत एकटे असल्याने तो थोडासा आत्ममग्न झालेला आहे. एक दिवस अचानक त्याच्या बंगल्यात एक मुलगी येऊन धडकते. ती मुलगी म्हणजे अरूणचा भुतकाळ आहे, तब्बल 18 वर्षानंतर या बाप लेकीच्या भेटी बरोबरच एका नव्या नात्याची सूरूवात होते.
सचिनने आपल्या कारकिर्दीला 50 वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने निर्मिती केलेल्या ’एकुलती एक’ मधुन श्रिआला लाँच करायच आहे हे लक्षात घेऊन संपुर्ण कथा लिहिली आहे. चित्रपटाची संपुर्ण कथा श्रियाच्या स्वरा भोवती गुंफण्यात आली आहे. श्रियाच्या अंगात असलेल्या सर्वगुणांना वाव कसा देता येइल याची संपुर्ण काळजी दिग्दर्शकामधील बापाने घेतली आहे. पालक विभक्त झाल्यानंतर एका पालकाकडे वाढलेल्या मुलांची नेमकी मानसीकस्थिती मांडण्याचा चांगला प्रयत्न ’एकुलती एक’ मधुन सचिनने केला आहे. चित्रपटाच्या कथेत फारसे नाविण्य नसले तरी ती नवी असल्याची भासते. चित्रपटाची सूरूवात थेट मुद्द्यांना हात घालुन करण्यात आल्याने पुढे काय होणार याचा अंदाज बांधणे प्रेक्षकांना अवघड जात नाही. मुलगी आणि वडील यांच्यात फुलणारे नाते दाखविण्याचे सर्व प्रसंग यात असल्यने कथेला फारसा वेग देण्यात दिग्दशकाला अपयश आले आहे. मध्यंतरापुर्वी पटकथा एकाच ठिकाणी रेंगाळल्याचे दिसते.
मध्यतरानंतर जशीजशी कथा उअलगडत जाते तसा चित्रपटाला वेग आला आहे यामुळे तोभाग सुसह्य बनला आहे. तसेच स्वरा निरागस आहे की अल्लड हा प्रश्न प्रेक्षकाला पडतो. एकुलती एक हा चित्रपट वडील – मुलीच्या नात्याभोवती फिरणारा असला तरी त्यात काही वेगळेपण दाखविण्याची आवश्यकता होती मात्र त्यात दिग्दर्शक म्हणुन सचिन कमी पडला आहे. चित्रपटातील संवाद खुसखुशीत आहेत, आजच्या तरूणाईला डोळ्यासमोर ठेऊन लिहिल्या गेल्याचे स्पष्ट जाणवते. संवदा प्रमाणेच दिग्दर्शनात नाविण्य असते तर चित्रपट अधिक भावस्पर्षी झाला असता हे निश्चित. स्वरा ’ च्या भूमिकेला श्रीया पिळगांवकरने योग्य न्याय दिला आहे. सचिनला एवढ्या गंभिर भुमीकेत पहाण्याची आपल्याला सवय नसली तरी अरूणच्या भुमिकेत तो फिट बसला आहे. अशोक सराफ यांनी साकारलेला अरूणचा सेक्रेटरी मेहताही लक्षात राहणारा आहे. किशोरी शहाणेच्या भुमीकेला फारस वाव नाही, सुप्रिया पिळगावर यांनी कमी प्रसंगाही आपली छाप सोडली आहे, सिद्धार्थ मेननने उत्तम साथ दिली आहे. सचिनने मुलीला लॉच करण्यासाठी कष्ट घेतले आहेत, सर्व जबाबदार्या चोख बजावल्या आहेत मात्र तरीही एकुलती एक प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात कमी पडला आहे. चित्रपट – ‘एकुलती एक’ निर्मितीः सुश्रीया चित्र दिग्दर्शक – सचिन संगीत – जीतेंद्र कुलकर्णी कलाकार – श्रीया पिळगांवकर, सचिन, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, सिद्धार्थ मेनन, किशोरी शहाणे. रेटिंग – * *