पी.चिदंबरम यांचा गुंतवणूकदारांना दिलासा

नवी दिल्ली, दि.२४ – भारतीय शेअर बाजारात नेहमी जागतिक बाजारातील घडामोडींप्रमाणे वाहावत न जाता निर्माण झालेल्या स्थितींचा अचूक अभ्यास केला जातो. त्यामुळे सध्या निर्माण झालेल्या स्थितीत गुंतवणूकदारांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जून आणि दुसरया सहामाहीत शेअर बाजारातील उत्साह परत येईल असा विश्वास अर्थमंत्री पी.चिदंमबरम यांनी व्यक्त केला. यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये झालेल्या घसरणीमुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

फेडरल रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष बीन ब्रेनेक यांनी स्टिम्यूलस पॅकेज काढून घेण्याची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदारांनी शेअर्स विकण्याचा सपाटा लावला. त्यामुळे पहिल्या सत्रात मुंबई शेअर बाजारात ३६५ अंशांची घट नोंदवली गेली. मात्र काही वेळानंतर निर्देशांकात पुन्हा वाढ दिसून आली.

मुंबई शेअऱ बाजारात आज झालेल्या घसरणीवर आमचे बारीक लक्ष आहे. ब्रेनेक यांच्या घोषणेमध्ये स्टिम्यूलस पॅकेज टप्प्याटप्प्याने काढून घेण्यात येईल असे स्पष्ट म्हटले होते. तरीही निर्देशांकात घट नोंदवली गेली, असे अर्थमंत्री म्हणाले.

Leave a Comment