पुणे, दि. 21 (प्रतिनिधी) -व्यापारी नेतृत्वाने जर सामंजस्य दाखविले असते तर एलबीटीविरोधातील लढा दोन दिवसात संपला असता. केवळ श्रेय लाटण्याच्या स्पर्धेत हा उशीर लागला, असा खळबळजनक खुलासा दि पूनामर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष अजित सेटिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
श्रेय लाटण्याच्या हव्यासाने बंद लांबला – अजित सेटिया
यावेळी माजी उपाध्यक्ष रमेशभाई पटेल, सहसचिव अशोक लोढा,माजी अध्यक्ष राजेश शहा, राजेशफुलपगर आदी उपस्थित होते. सेटिया म्हणाले, ‘‘एलबीटी विरोधात बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा दिल्यानंतर संंपाच्या पहिल्याच दिवशी मु‘यमंत्र्यांनी फेडरेशन ऑफ असोसिएशन महाराष्ट्राचे (फाम) अध्यक्ष मोहन गुरमानी यांना एक समिती गठित करण्यास सांगितले होते. या समितीमध्ये गुरमानी, पुणे आणि नागपूरचा प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि दोन वकिलांचा समावेश करायचा होता. या समितीत पुण्याचा प्रतिनिधी म्हणून गुरमानी यांनी माझे नाव सुचवले होते, या समितीमध्य ेमी पुण्याचा प्रतिनिधी, पिंपरी – चिंचवडमधून खासदार गजानन बाबर, नागपुरमधुन दिपेन अगरवाल आणि मुंबईमधून प्रकाश मेहता आणि दिपक बापट या दोन सीएंचा समावेश होता. या समितीची 9 मे रोजी घोषणा होऊन 10मे रोजी मु‘यमंत्र्यांसोबत बैठक होणार होती.
मात्र, पुणे व्यापारीमहासंघाचे खजिनदार फत्तेचंद रांका यांनी सेटिया समितीमध्ये असतील तर आम्ही चर्चा करणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे या समितीची स्थापना बारगळली आणि बंद लांबला. महासंघाची भूमिका नेहमीच तळ्यात-मळ्यात राहिल्याचे सांगताना सेटिया म्हणाले, एलबीटीसाठीमर्चंटने सकारात्मक भुमीका सूरूवातीपासून मांडली. जाचक अटी रद्द करून कायदा सोपा असावा अशी आमची भूमिका होती. महासंघाने मात्र कधी जाचक अटी रद्द करा, तर कधी एलबीटीच नको अशी भूमिका घेतली होती. एलबीटीचा तिढा सुटण्यामध्ये आम्ही घेतलेली सकारात्मक भूमिका महत्वपूर्ण ठरली.
——————————-
