काबूल, दि.१७ – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये नाटोच्या फौजांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या शक्तिशाली आत्मघातकी हल्ल्यात किमान १४ जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. मृतात नाटोच्या सहा जवानांचा व दोन मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यात सुमारे ३७ जखमी झाले आहेत. काबूलमधील गेल्या दोन महिन्यांतील हा सर्वांत मोठा हल्ला आहे.
अफगाणिस्तानात नाटोच्या ताफ्यावर हल्ला – १४ ठार
काबूलच्या नैर्ऋत्येकडील शाह शाहीद जिल्ह्यात हा हल्ला करण्यात आला. हिजब-ए-इस्लामी या दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यात नाटोचे एक स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) पूर्णपणे नष्ट झाले. स्थानिक वेळेनुसार, गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास नाटोच्या ताफ्याशेजारी दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली कार उडवून दिली. त्यात शेजारून जाणार्या या सहा नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात १० घरे पूर्णपर्ण उद्ध्वस्त झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
