प्रामाणिक रिक्षावाला – २ कोटींचा धनादेश गुजरात सरकारला परत

rick

अहमदाबाद, दि. १६ – गुजरात सरकारने दिलेला तब्बल १ कोटी ९० लाख रुपयांचा धनादेश प्रामाणिकपणे परत करणारा राजू भरवाद हा अहमदाबादमधील रिक्षावाला सध्या बातमीचा विषय झाला आहे.

आणंदमधील टाटा मोटर्सच्या नॅनो प्रकल्पाजवळची जमीन गुजरात सरकारने संपादित केली आहे. यातील तीन बिघा (पाच गुंठे) जमीन राजूच्या नावावर होती. गुजरातच्या भू-संपादन कायद्यानुसार त्यांनी राजूला त्याच्या जमिनीचा मोबदला म्हणून १ कोटी ९० लाख रुपयांचा धनादेश पाठवला; परंतु हा चेक राजूनं नाकारला. कारण, जी जमीन सरकारनं संपादित केली होती, तो तुकडा त्यानं काही वर्षांपूर्वी विकला होता. सरकारी नोंदीत त्या जमिनीवर माझं नाव असलं, तरी ती आता आमच्या कुटुंबीयांची नाही. त्यामुळे जमिनीच्या नव्या मालकालाच हा चेक द्या, अशी विनंती राजूनं अधिकार्‍यांना केली. राजूच्या नावावर असलेल्या सात बिघा जमिनीपैकी तीन बिघा जमीन राजूनं विकली; परंतु या व्यवहाराची नोंद सरकार दरबारी झाली नव्हती आणि त्यातूनच चेकची गल्लत झाली.

जुन्या सरकारी तपशिलांप्रमाणे, तीन बिगा जमिनीवर राजूचं आणि त्याच्या आईचंच नाव होतं. त्यामुळे १ कोटी ९० लाखांचा चेक त्यांच्याच घरी आला, पण तो परत करण्याचा प्रामाणिकपणा भरवाद कुटुंबीयांनी दाखवलाय. त्यामुळे या कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

Leave a Comment