लातूर – लातूरच्या उदगीर तालुक्यातील नळेगावच्या एसटी बसस्टँडवर उभ्या असलेल्या उदगीर-लातूर बसमध्ये शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास मोठा स्फोट झाला. यामध्ये बसमधील १७ प्रवासी जखमी झाले असून, सात जण गंभीर आहेत. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी , घटनास्थळी वायर, क्रूड ऑइल सापडल्याने हा घातपाती बॉम्बस्फोट आहे काय, या दिशेने तपास सुरू आहे.
उदगीर-लातूर बसमध्ये स्फोट; १७ जण जखमी
नळेगावच्या स्टँडवर बस थांबवून नियंत्रकाकडे नोंद करण्यासाठी चालक जात असतानाच जोरदार स्फोट झाला. स्फोटात काही सीट आणि काचांचा चक्काचूर झाला. बसमधील ३८ प्रवाशांपैकी १७ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लातूर येथील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी सात जणाची प्रकुर्ती गंभीर आहे.
दरम्यान घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याने , संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. घटनास्थळी वायर, क्रूड ऑइल सापडल्याने हा घातपाती बॉम्बस्फोट आहे काय, या दिशेने तपास पोलिस करीत आहेत.
