नवी दिल्ली: मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यात शास्त्र बाळगल्या प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता संजय दत्त याची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने संजय दत्त याला दि. १५ मे पर्यंत आजार होण्याचे आदेश दिले आहेत.

संजय दत्त याला बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ५ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयात पुनर्विचार करण्याचे कोणतेही सबळ करण दिसत नसल्याची टिपण्णीही न्यायालयाने केली.
संजय दत्त याला ९ एमएम पिस्तुल आणि ए के ४७ ही अत्याधुनिक रायफल बाळगल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यात ५ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यापैकी १८ महिन्याचा कारावास संजय दत्त याने यापूर्वीच भोगला असल्याने आणखी सुमारे साडे तीन वर्ष तुरुंगवास संजयला भोगावा लागणार आहे.
संजय बरोबरंच युसुफ मोहसीन नळवाला, खालील अहमद सीड अली नझीर, मोहम्मद दाऊद युसुफ खान, आसिफ युसुफ शेख, मुझम्मील उमर कादरी, मोहोम्मद अहंमद शेख या आरोपींची पुनर्विचार याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.