शिक्षण वाह्य कामातून शिक्षक वर्गाची सुटका

पुणे, दि. 6 (प्रतिनिधी) – एक जूनपासून सर्व अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करणारे परिपत्रक राज्य सरकारने काढल्याने तब्बल पाच लाख प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. सार्वत्रिक निवडणुकांव्यतिरिक्त अन्य अशैक्षणिक कामे शिक्षकांना दिली जाणार नाहीत. शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादल्याने गुणवत्तेचा दर्जा खालावतो अशी ओरड नेहमीच केली जाते. परंतु आता या कामातून शिक्षकांची सुटका झाल्याने जिल्हापरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थाच्यावतीने चालवल्या जाणार्‍या शाळांचा दर्जा सूधारणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांना जिल्हाधिकारी, पंचायत समिती तसेच , तहसील कार्यालयात विविध कामांसाठी जुंपले जायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. या संदर्भात शिक्षक परिषदेचे शिक्षक आमदार रामनाथ मोते यांच्यासह अन्य शिक्षक आमदारांनी विधिमंडळात चर्चा घडवून आणली होती, तसेच मागील दोन वर्षापासून पुण्यात मनसेतर्मे या विषयावर आंदोलन करून शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, अशी मागणी करण्यात येत होती. बालकांचा मोमत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार, राज्यातील शिक्षकांना मोकळा श्वास घेता येणार आहे. तसेच या परिपत्रकानुसार शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादली गेल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची तरतूद आहे.

ही आहेत अशैक्षणिक कामे
मतदार यादी दुरूस्ती, मोटो पास वितरण , विविध प्रकारची सर्वेक्षणे, केबल सर्वेक्षण (तहसिलदार कार्यालय), सरकारी योजनांचा प्रसार, शाळाबाह्य मुलांची यादी तयार करणे, वर्ग खोल्यांच्या बांधकामांचा जमाखर्च ठेवणे, कुटुंब सर्वेक्षण, शालेय पोषण आहाराअंतर्गत खिचडी शिजवणे
————-