‘कोकणस्थ’ १० मे पासून

महाराष्ट्रातील प्रथम कमांकाची लोकपिय मराठी जीईसी वाहिनी स्टार प्रवाहने चित्रपट डिस्ट्रिब्यूशन आणि मार्केटिंग क्षेत्रात पदार्पण केले आहे. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित, कोकणस्थ या चित्रपटाद्वारे स्टार प्रवाहने या क्षेत्रात श्रीगणेशा केला आहे. 10 मे 2013 पासून हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने स्टार प्रवाह सारखी दर्जेदार मनोरंजन वाहिनी आणि चित्रपट सृष्टीतील नामवंत दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रथमच एकत्र येत आहेत.

या् प्रसंगी स्टार प्रवाहच्या क्रिएटीव्ह डिरेक्टर श्रीमती श्रावणी म्हणाल्या, “दर्जेदार आणि नवनवीन मनोरंजनामुळे स्टार प्रवाह महाराष्ट्रातील लोकपिय वाहिनी आहे. डिस्ट्रिब्यूशन आणि मार्केटींग क्षेत्रातील पदार्पणामुळ आम्ही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुढचे पाऊल टाकले आहे.” कोकणस्थ ही कहाणी रामचंद्र गोविंद गोखले या एका मध्यमवर्गीय माणसाची आहे. एक निवृत्त आणि शांत आयुष्य जगत असलेल्या रामचंद्र गोविंद गोखले यांच्या जीवनात एका घटनेमुळे उलथापालथ होते. आपलं सर्वस्व हरवून बसलेला हा सामान्य माणूस आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध उभा राहतो, आपला स्वाभिमानी बाणा शेवटपर्यंत कायम ठेवून लढा देतो.

रामचंद्र गोविंद गोखले यांच्या प्रमुख भूमिकेत सचिन खेडेकर आहेत आणि त्यांना साथ दिली आहे सोनाली कुलकर्णी, उपेन्द्र लियमे, नवोदित कलाकार वैदेही परशुरामी आणि रोहन तळवळकर यांनी. कोकणस्थचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यावेळी म्हणाले,“कोकणस्थ ही सामान्य माणसाच्या संघर्षाची कहाणी आहे. तो शांत आणि संयमित आहे तो त्याच्या बुद्धीमत्तेमुळे, पण वेळ आली तर मोठ्यात मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची हिंमत ठेवतो. या चित्रपटात रामचंद्र गोविंद गोखले यांची भूमिका सचिन खेडेकरने अप्रतिम साकारली आहे आणि सोनाली कुलकर्णीने त्याला उत्तम साथ दिली आहे. मला विश्वास आहे की स्टार प्रवाहच्या सशक्त नेटवर्पमुळे हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात पोहाचेल.” कोकणस्थ चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा देखील या प्रसंगी पार पडला. लोकपिय गायक आणि संगीतकार हरिहरन यांचा मुलगा अक्षय हरिहरन याने या चित्रपटाद्वारे संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाउल टाकले आहे. याप्रसंगी हरिहरन यांनी चित्रपटातील काही गाणी उपस्थितांसमोर सादर केली. या चित्रपटात हरिहरन, शंकर महादेवन, साधना सरगम या नामवंत गायकांनी गाणी गायली आहेत.