पत्रकार व राजकारणी यांनी दुर्लक्षितांकरिता संघटित होण्याची गरज- विनोद तावडे

पुणे,दि28:(प्रतिनिधी) प्रसारमाध्यमे टीआरपीमध्ये आणि नेते मतदार संघांमध्ये गुरफटलेले आहेत. त्यामुळे राष्ट्र हिताचा विचार मागे पडला असून व्यवस्थेमध्ये नकारात्मकता वाढत आहे. या परिस्थितीत प्रसारमाध्यमांनी नागरिकांचे आत्मबल वाढविण्याची आवश्यकता आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते श्री विनोद तावडे यांनी पुण्यात पत्रकार वरुणराज भिडे पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना सांगितले. यावर्षीचा वरुणराज भिडे प्रमुख पुरस्कार औरंगाबादचे श्री संजीव उन्हाळे यांना देण्यात आला तर इलेक्ट्रानिक माध्यमाचा आश्वासक पत्रकारिता पुरस्कार निलेश खरे यांना देण्यात आला. मुद्रित पत्रकारितेतील दोन आश्वासक पत्रकारिता पुरस्कार आरती कदम, अशोक तुपे यांना देण्यात आले.

श्री तावडे पुढे म्हणाले, राज्यात दुर्बल सरकार आणि हतबल मु‘यमंत्री अशी स्थिती असल्याने कोणीही कोणते निर्णय घेण्याच्या प्रकि‘येत नाही व घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या स्थितीत मुखयमंत्री नाहीत, सध्याच्या कालखंडात पिडीत आणि संपप्त लोकांना मार्ग सापडत नाहीत. त्यामुळे त्यांचे आत्मबळ वाढवावे लागणार आहे. लोकशाहीच्या चारही स्तंभांमध्ये नकारात्मक वातावरण असले तरी त्यात काही चुकीचे आहे, असे म्हणणेही योग्य नाही. मात्र विश्‍वासाचे वातावरण या चारही स्तंभांभोवती उभे रहाणे आवश्यक आहे. सध्या प्रसारमाध्यमे टीआरपीमध्ये आणि नेते मतदार संघांमध्ये गुरफटलेले आहेत.

त्यामुळे राष्ट्राचा आणि राज्याच्या हिताचा विचार मागे पडला आहे. व्यवस्थेतील नकारात्मकेतमुळे पिडीत जनता संतप्त आहेत. त्यातच माध्यमांमध्येही मोठ्या प्रमाणावर बदल होत असल्यामुळे पत्रकार, राजकीय नेते आणि सामान्य जनतेला या बदलांशी जुळवून घ्यायला वेळ लागणार आहे. या परिस्थितीत आत्मबल वाढल्यास यंत्रणाही कार्यक्षम होतील आणि परस्परांच्या विश्‍वासातून नकारात्मकताही दूर होईल असेही तावडे यांनी बोलून दाखविले.

श्री सुरेश द्वादशीवार म्हणाले, पत्रकारांना वृत्तपत्राच्या मालकांचे ऐकावे लागते याही पेक्षा एक मोठी समस्या सध्या पुढे आली आहे ती म्हणजे गुंडांच्या धमक्या वाढल्या आहेत. त्याच प्रमाणे पेड पत्रकारिता हीही मोठी समस्या झाली आहे. तलाठ्यापासून ते निरनिराळ्या कचेर्‍यापर्यंत नवे बारा बलुतेदार तयार झाले आहेत याची आपणच अधिक दखल घेणे आवश्यक आहे. प
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष प्रा वि अ जोशी यांनी प्रास्ताविक केले.
छायाचित्रात श्री संजीव उन्हाळे यांना वरुणराज भिडे पुरस्कार प्रदान करताना श्री विनोद तावडे, शेजारी ज्येष्ठपत्रकार सुरेश द्वादशीवार