पुणे, दि. 28 (प्रतिनिधी) – भारतात आपले स्वागत होईल असे गृहीत धरून चीन बाजारपेठेत व सीमेवरही घुसखोरी करत आहे. देशात डाव्या विचारसरणीचे लोक आहेत, नक्षलवाद फोफावत आहे यामुळे चीनचा भारतातील लोक आपले स्वागत करतील असा गैरसमज निर्माण झाला आहे. चीन बाबत कठोर भूमिका घेऊन आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन शेतकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी यांनी केले.
चीनची बाजारपेठेतील घुसखोरी सीमेवरील घुसखोरीयेवढीच घातक- शरद जोशी
सेतुचे संस्थापक शरद देशपांडे यांच्या ‘शब्दार्थ – एका कॉपीरायटचा प्रवास’ या कॉपी रायटींग विषयात्मक आत्मचरित्राचे प्रकाशन डी.एस. कुलकर्णी आणि जोशी यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी ऋतुपर्ण देशपांडे, ऋग्वेद देशपांडे उपस्थित होते.
जोशी म्हणाले, चिनी लोकांना भारत आपले स्वागत करतोय असे वाट आहे त्यागचे कारण चिनी वस्तूंचा खप भारतात होतो म्हणुन वाटत असेल. चीनच्या आठमुठ्या धोरणाला विरोध करण्यासाठी चिनी मालावर बहिष्कार टाकावा यासाठी मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशपांडे यांच्याशी असलेले ऋणानुबंध उलगडताना जोशी यांनी सांगितले की, देशपांडे अतिशय गोड बोलणारे व्यक्तिमत्व आहे, माझ्या सारख्या सामान्य शिक्षकाचा ते गुणवंत विद्यार्थी आहेत. शेतकरी संघटनेचा नेता म्हणून मला यश मिळाले असले तरी मे मुळचा शिक्षकी पेशात होतो आणि शेतकर्यांवर जसा प्रभाव पाडू शकलो तसा विद्यार्थ्यांवर पाडू शकलो नाही याची खंत जोशी यांनी यावेळी व्यक्त केली.
कुलकर्णी म्हणाले, भारत सरकार विदेशातील उद्योजकांच्या स्वागतासाठी पायघड्या घालून तयार आहे. आपल्या देशातील उद्योजकांना योग्य वाटचाल करण्याची संधी दिली, प्रशासनातील भ्रष्टाचार कमी केला तर आपल्या देशातील उद्योगपती चीनशी सामना करण्यास सक्षम आहेत याची खात्री शासनाने बाळगायला हवी.
