महिला वारसदार आल्यास आनंदच – दलाई लामा

वॉशिंग्टन दि.२५ – तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी त्यांच्यानंतर त्यांच्या स्थानावर महिला स्थानापन्न झाली तर त्यांना आनंदच होईल असे सांगून आपल्या सुधारणावादी दृष्टीकोनाचे दर्शन घडविले आहे. चॅनल न्यूज फोर च्या कॅथी न्यूमन यांनी दलाई लामांना तुमच्या जागी महिला विराजमान झाली तर तुम्हाला काय वाटेल असा प्रश्न विचारला होता त्याला उत्तर देताना दलाई लामा बोलत होते.

ते म्हणाले, स्त्रिया नैसर्गिक रित्याच अधिक भावनाशील असतात. माया, प्रेम, आपुलकी हे गुण त्यांच्यात अधिक प्रमाणात असतात आणि त्यांचा वापर करण्याची महिलांची क्षमताही पुरूषांच्या तुलनेत अधिक असते. महिला जास्त संवेदनशील असतातच पण मानवतेच्या हितासाठी कोणतेही काम करून घेण्याच आणि करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत असते.

दलाई लामा यांनी यापूर्वीही २००८ साली त्यांच्या जागी महिला वारसदार येऊ शकते असे विधान केले होते.