
वॉशिग्टन दि. २४ – असोसिएटेड प्रेसचे ट्विटर अकौंटवरून व्हाईट हाऊसमध्ये दोन बॉम्बस्फोट झाल्याच्या आणि त्यात राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जखमी झाल्याच्या ब्रेकिंग न्यूजने अमेरिकेत चांगलीच खळबळ माजली. अमेरिकेचा शेअर बाजारही या वृत्ताने गडगडला. मात्र हे अकौंट हॅक झाले असल्याचे आणि त्यावरून नुकत्याच प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या खोट्या असल्याचा खुलासा व्हाईट हाऊसमधील असोसिएटेड प्रेसच्या प्रतिनिधी ज्युली पेस आणि व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जे कार्नी यांनी पत्रकार परिषदेत केल्याने सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू झाले.
