
’ पुणे, दि. 22 (प्रतिनिधी) – हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या एकुलत्या एक कन्येला रूपेरी पडद्यावर झळकायचे वेध लागले आहेत. सचिन आणि सुप्रियाप्रमाणेच अभिनयात कारकिर्द करायचा निर्णय श्रीयाने घेतला असून ’एकुलती एक’ या चित्रपटामधुन ती आपल्याल 23 मे रोजी भेटणार आहे. ’एकुलती एक’ मध्ये एक मुलगी आणि तिच्या वडीलाची कथा रेखाटण्यात येणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या या पहिल्याच चित्रपटात ती तिचे वडील सचिन पिळगांवकर याच्यासोबत काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगांवकर करत आहेत. तर अभिनेता स्वप्नील जोशी गेस्ट अपिअरन्स मध्ये या सिनेमात दिसणार आहे. तसे पाहता श्रिया अभिनेत्री म्हणून पदार्पण करीत असली तरी तिने दिग्दर्शित केलेल्या ड्रेसवाला’ आणि पेंटेड सिग्नल’ या शॉर्ट फिल्म्सना इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये दाद मिळाली आहे.
