आता गोविंदा होणार जज

आतापर्यंत बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या भूमिका करून मनोरंजन करणारा अभिनेता गोविंदा आता जज होणार आहे. बॉलीवुडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा हा छोट्या पडद्यावर रियलिटी शो ‘इंडियन मॉडल हंट-२०१३ ‘ मध्ये जजची भूमिका करणार आहे.

अभिनेता गोविंदाने यापुर्वी गेम शो ‘जीतो छप्पर फाड़ के’ मध्ये होस्टची भूमिका केली होती. यापूर्वीच्या रियलिटी शो मध्ये त्याने जजची भूमिका केली नव्हती. या नवीन भूमिकेत काम करण्याबद्दल बोलत असताना गोविंदा म्हणाला, ‘ माझ्याजवळ कित्येक प्रतिभाशाली व्यक्ती आहेत. त्यांच्या मुळेच मी जज होण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीपण मी छोट्या पडद्यावर काम केले आहे. या माझ्या येत असलेल्या नवीन शो मध्ये प्रेक्षकांसाठी संगीत, मनोरंजन आणि नाटक सर्व काही पाहयला मिळणार आहे. त्यामुळे हा शो सर्वाना आवडेल असे मला वाटते.’

आगामी काळात लवकरच गोविंदा मोठ्या पडद्यावर खलनायकच्या रुपात झळकणार आहे. त्याच्या या सिनेमाची उत्सुकता सर्वाना लागली आहे. या सिनेमावर बरेच काही अवलंबून असल्याने गोविंदाचे लक्ष सुद्धा या सिनेमाकडे लागले आहे.