होंडा पाठोपाठ बजाज, टिव्हीएस दुचाकी महागल्या

नवी दिल्ली दि.१९ – बजाज ऑटोने त्यांच्या मोटरसायकलच्या किमतीत पाचशे रूपये वाढ गेली असून टिव्हीएसनेही त्यांच्या दुचाकींच्या किमती वाढविल्या आहेत. होंडा कंपनीने त्यांच्या दुचाकींच्या किमती नुकत्याच वाढविल्याचे जाहीर केले आहे त्या पाठोपाठ वरील कंपन्यांनीही त्यांच्या दुचाकीचे भाव वाढविले आहेत.

याविषयी बोलताना बजाज ऑटो मार्केटिगचे अध्यक्ष के. श्रीनिवासन म्हणाले की आमच्या मोटरसायकल्सच्या किमती ५००रूपयांनी वाढविल्या आहेत कारण कंपनीच्या वाहतूक खर्चात तसेच अन्य खर्चातही वाढ झाली आहे. टिव्हीएसने त्यांच्या गाड्यांच्या किमतीत पाव ते अर्धा टक्का वाढ केली आहे. ही वाढ चार एप्रिलपासूनच लागू करण्यात आली आहे.

डिझेलवर होणारा तोटा भरून काढण्यासाठी तेल कंपन्याना डिझेलचे दर दर महिन्याला वाढविण्याची परवानगी दिली गेली आहे त्यामुळेही वाहन उत्पादन कंपन्यांचे खर्च वाढले असल्याचे श्रीनिवासन यांनी सांगितले.