मुंबई दि.१७ – १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा झालेली झैबुन्निसा काझी हिने दाखल केलेली शरण येण्यासाठीची मुदत वाढीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. त्याचबरोबर अन्य दोघांचीही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे या तिघांनाही आता १८ एप्रिलला शरण यावे लागणार आहे.
झैबुन्निसा काझीला उद्याच शरण यावे लागणार
मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरलेल्या झैबुन्निसा काझी (७०) हिला २१ मार्चला न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. शरण येण्यासाठी तिला १८ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. झैबुन्निसा हिला कॅन्सर झालेला आहे.
शरण येण्यासाठी आपल्याला मुदतवाढ अशी याचिका झैबुन्निसासह शरीफ अब्दूल गफूर (८८) आणि इशाक हजवाने (७६) यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने त्यांची याचिका मंगळवारी फेटाळली असून १८ एप्रिललाच शरण येण्याचे आदेश त्यांना दिले.
