मोदींवरुन भाजप आणि जद (यु)मध्ये साठमारी

नवी दिल्ली: गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरून भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्वाचा मित्रपक्ष असलेला जनता दल (यु) यांच्या वादाला आता चांगलीच धार चढू लागली आहे. गुजरात थंबिण्यचॆ जबाबदारी नव्हे तर मोदी यांची होती; अशा शब्दात जदचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपवर पलटवार केला आहे.

मोदी हे ‘सेक्युलर’ नसल्याने पंतप्रधानपदासाठी जदचा त्याना विरोध असून नितीश कुमार यांनी वेळोवेळी तो व्यक्त केला आहे. यावर प्रत्युत्तर देताना भाजपचे राष्ट्रीय सचिव रामेश्वर चौरासिया यांनी सोमवारी बोलताना; गोध्रा दंगल रेल्वेत सुरू झाली आणि नितीश कुमार त्यावेळी रेल्वे मंत्री होते आणि त्या काळात त्यांनी गुजरातचा दौराही केला; याची आठवण करून दिली. याला नितीश कुमार यांनी मंगळवारी चोख प्रत्युत्तर दिले.

गुजरात दंगलीच्या वेळी आपण रेल्वे मंत्री होतो आणि त्या जबाबदारीने आपण गुजरातला भेटही दिली. ही भेट रेल्वेची सुरक्षा आणि संबंधित बाबींसाठी होती. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याच्या अखत्यारीतील विषय असून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दंगली थोपविण्याची जबाबदारी मोदींवर होतॆ. आपल्यावर नाही; असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.