मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बेताल वक्तव्याच्या विषयावर चर्चा करण्यास अध्यक्षांनी दिल्याच्या कारणावरून विधानसभेतील विरोधी सदस्यांनी स्प्मावारी सभात्याग केला. त्यामुळे विरोधकांच्या अनुपस्थितीत प्रश्नोत्तराचा तास पार पडला.

अजित पवारांचे बेताल वक्तव्य आणि त्यांनी आत्मक्लेशासाठी केलेले उपोषण यावर चर्चा करण्यास परवानगी मिळावी; अशी मागणी विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे, भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मात्र या विषयावर प्रश्नोत्तराच्या तासानंतर चर्चा करण्यास परवानगी देण्याची तयारी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दर्शविली.
यावर नापसंती व्यक्त करून विरोधकांनी सभात्याग केला.
पवार यांनी इंदापूर येथील सभेत बोलताना दुष्काळ, वीज आणि पाण्याचा तुटवडा याबाबत अशोभनीय वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी सदनाची आणि जनतेची माफी मागितली. आपल्या विधानांबद्दल पश्चात्ताप झाल्याचे सांगत त्यांनी कराड येथे आत्मक्लेशासाठी एक दिवस उपोषणही केले. मात्र हे पवार यांचे थोतांड असल्याचा आरोप करून विरोधक पवार यांच्या राजीनामा किंवा हकालपट्टीच्या मागणीवर ठाम आहेत.