अभिनेत्री प्रीति जिंटाने देशातील नेतेमंडळीच्या व्यवहारावर सवाल उपस्थित केला आहे. गेल्या काही दिवसापासून खासदार मंडळी संसदेत ज्या पद्धतीने व्यवहार करीत आहेत; तो पहिला तर तो सहन करण्यासारखा नाही. त्यांचे वर्तन बेजबाबदार आहे. त्यामुळेच मी आगामी काळात राजकारणात प्रवेश करण्याचा विचार करीत आहोत; असे प्रीतीने सांगितले.
एका पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी आलेली प्रीति म्हणाली, ‘आगामी काळात मी राजकरणात प्रवेश करण्याचा विचार करीत आहे. मी राजकारणात केवळ नाव कमवायचे म्हणून जाणार नाही तर मला देशाचे चित्र बदलायचे आहे. त्यामुळे मी लवकरच राजकरणात प्रवेश करण्याच्या बाबतीत घोषणा करणार आहे.’
प्रीतिने यावेळी कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे ठरविले नाही. राजकरणात प्रवेश करण्याच्या सूचना तिला ब-याच लोकांनी दिल्या आहेत. मात्र त्यावर मी विचार करीत असून त्यानंतरच मी योग्य तो निर्णय घेणार आहे. प्रवेश करण्यासाठी काहीच गडबड नसून पूर्ण विचाराअंती निर्णय घेणार असल्याचे प्रीतीने स्पष्ट केले.