मुंबई दि.१२ – मालेगांव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिला काल रात्री अर्धांगवायूचा झटका आल्याचे भोपाळ येथील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असल्याचे समजते. यामुळे एनआयएच्या चौकशीत अडथळे निर्माण होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. प्रज्ञासिंग हिच्या शरीराची डावी बाजू अर्धांगवायूने लुळी पडली असल्याचे तपास अधिकार्यांनी सांगितले.
साध्वी प्रज्ञासिंगला अर्धांगवायूचा झटका
प्रज्ञासिंग हिला मोक्काखाली अटक करण्यात आली असून ती आक्टोबर २००८ पासून कोठडीत आहे. तिने अनेकवेळा कर्करोग झाला असून तपासणीसाठी रूग्णालयात नेण्याची व जामीन देण्याची विनंती न्यायालयात केली होती मात्र दरवेळी राष्ट्रीय तपाससंस्थांनी तिच्या जामीनाला विरोध केला होता. प्रज्ञा हिला गेल्या वर्षी मुंबईच्या तुरूंगातून भोपाळ येथे हलविले गेले असून तिच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सुनील जोशी यांच्या हत्येचाही आरोप लावला गेला आहे.
