
नवी दिल्ली दि.१०- येत्या सहा महिन्यात शिक्षा संपवून जे कैदी तिहार मधून बाहेर पडणार आहेत त्यांच्यापैकी ३० जणांना विविध कंपन्यांनी नोकरीसाठी ऑफर दिल्या असल्याचे समजते. तिहार जेल नंबर तीनमध्ये भरविण्यात आलेल्या प्लेसमेंट कार्यक्रमात १४ कंपन्या सहभागी झाल्या होत्या आणि त्यातून ३० जणांना नोकऱ्या मिळाल्या असल्याचे तिहार जेलचे कायदा अधिकारी आणि प्रवक्ते सुनील कुमार यांनी सांगितले.
