‘मदर इंडिया’चा रीमेक शक्य नाही-विद्या

गेल्या काही दिवसापासून जुन्या सिनेमाची निर्मिती करण्याचा ट्रेंड आला आहे. त्यामुळे आता कुठल्याही सिनेमाचा रीमेक तयार केला जात आहे. फिल्मकार मेहबूब खानचा ऑस्करसाठी नामांकित झालेला ‘मदर इंडिया’ या सिनेमाचे रीमेक तयार करणे शक्य नसल्याचे मत अभिनेत्री विद्या बालनने व्यक्त केले आहे. या सिनेमाचा जरी कोणी रिमेक तयार केला तर त्याचा हिस्सा आपण राहणार नसल्याचे मत अभिनेत्री विद्या बालनने व्यक्त केले.

भारतीय सिनेमाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमिताने विद्या ‘सिनेब्लिट्ज’ च्या विशेष भागाचे आयोजन करण्यात आले होते. १९५७ साली प्रदर्शित झालेल्या ‘मदर इंडिया’ सिनेमातील अभिनेत्री नर्गिसचा लुक आणि १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘साहिब बीबी और गुलाम’ मधील मीना कुमारीच्या लुक मध्ये दिसणार आहे.

‘परिणीता’ या सिनेमाच्या रीमेक मधून सिनेसृष्टीत एन्ट्री करणा-या विद्याचा ‘मदर इंडिया’ या सिनेमाच्या रीमेक मध्ये काम करण्याचा इरादा नाही. त्यामुळे आगामी काळात ‘मदर इंडिया’ चा रीमेक तयार करण्याची हिम्मत कोण करेल असे वाटत नहि. सध्या विद्या फरहान अख्तरच्या ‘शादी के साइड इफैक्ट्स’ या सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे. इमरान हाशमी सोबत येत असलेल्या ‘घनचक्कर’ या सिनेमाच्या पोस्टरचा पहिला लूक नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे.