राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये राम कोंडीलकरांच्या चित्रपटांची हॅट्ट्रिक!

अलीकडच्या काळात राम कोंडीलकरांकडे जनसंपर्काची जबाबदारी असलेल्या `धग’ या चित्रपटाला राष्टीय पुरस्कार लाभला आहे. गतवषी सुवर्णकमळ विजेत्या`देऊळ’ या चित्रपटाच्या जनसंपर्काचे काम राम कोंडीलकरांनीच पाहिले होते. तसेच त्याआधीच्या `जोगवा’ या ६ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या
चित्रपटाच्या प्रसिध्दीचे कामही राम कोंडीलकरांनीच केले होते. असे यश मिळवलेले राम कोंडीलकर हे प्रसिध्दी आणि जनसंपर्प व्यवस्थापनातले आजवरचे पहिले आणि एकमेव व्यक्तिमत्व आहे. हा असा मान आजवर कोणालाही मिळालेला नाही.

मनोरंजनाच्या क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटात ज्यांचे योगदान असते त्या प्रत्येकालाच महत्व प्राप्त होत असते. चित्रपट हे असे क्षेत्र आहे की तो कितीही दर्जेदार असला तरीही प्रसिध्दी माध्यमाची साथ जर व्यवस्थित नसेल तर चित्रपटाला अपेक्षित यश मिळत नाही. आणखी एकमहत्वाची गोष्ट म्हणजे एका चित्रपटासाठी वापरलेल्या प्रसिध्दीच्या तंत्राचा उपयोग दुसऱया चित्रपटाला होत नसतो, कारण प्रत्येक चित्रपटाची जातकुळी वेगळी असते, हेच वेगळेपण लक्षात घेऊन चित्रपटाचे प्रसिध्दी तंत्र हाताळणे आवश्यक असते.

गेली सुमारे दहा वर्ष म्हणजे तब्बल एक दशक प्रसिध्दी आणि जनसंपर्काचे काम करणारे राम कोंडीलकर हे सगळ्यांना परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे.

सुरुवातीला दिवसा काम आणि रात्री शिक्षण करुन अत्यंत मेहनतीने प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यातून मार्ग काढतानाच प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी आजवरची ही यशस्वी वाटचाल केली आहे. `राम पब्लिसिटी’ ही स्वत:ची संस्था त्यांनी २००२ साली सुरु केली. आपल्याकडे जो निर्माता चित्रपट घेऊन येईल त्याला शक्य असलेली सगळी मदत करण्यासाठी
यांची सतत धडपड असते. त्यांच्या याच धडपडीला आत्ता कुठे यश येताना दिसायला लागले आहे.