पासपोर्टसाठी आता पोस्ट ऑफिसमध्येही ऑनलाईन अर्ज

पुणे, दि. 6 (प्रतिनिधी) – पासपोर्ट करीता लागणारे शुल्क कागदपत्र पडताळणीनंतर घेतले जाते, अर्ज भरूनही पडताळणीस अनुपस्थित राहणार्‍या अर्जदारांची संख्या मोठी आहे. यामुळे ज्या नागरीकांना अवश्यकता असते त्यांना वेटींगवर थांबावे लागते. कागदपत्र पडताळणी प्रक्रिया नागरीकांनी गांभिर्याने घ्यावी यसाठी आता अर्ज भरतानाच पासपोर्ट शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्य पासपोर्ट अधिकारी मुक्तेश परदेशी यांनी शनिवारी दिली.

पासपोर्ट सेवा केंद्र, पासपोर्ट कार्यालयातील सुविधा याची पहाणी करण्यासाठी परदेशी पुण्यात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार प्रकाश जावडेकर, टीसीएचे उपाध्यक्ष तन्मय चक्रवर्ती, पुणे पासपोर्ट ऑमिसच्या मुख्य अधिकारी शकुंतला राणे शालिनी माथुर, टी. डी. शर्मा आदी उपस्थित होते. परदेशी म्हणाले, काही नागरीकांच्या बेजबाबदारपणामुळे महत्वाची कामे असलेल्या नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागतो त्यावर उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ही आगाऊ रक्कम ऑनलाईन बँकींग, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, बँक चलनाच्या माध्यमातून भरता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नागरीकांना अडचण येते यावर उपाय आणि ट्रॅव्हल एजंटस्ची वाढती समस्या दूर करण्यासाठी देशातील पाच राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावर सिटीझन सर्व्हिस सेंटर आणि पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्याची योजना या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करणार असल्याचे त्यांनी सािंगतले. पुण्यामध्ये कागदपत्र तपासणी करण्यासाठी दररोज 775 नागरीकांना बोलावले जाते यात वाढ करून पुढील आठवड्यापासून 1 हजार 100 नागरीकांना बोलविण्यात येणार आहे. तसेच पोलिस पडताळणीचा कालावधी कमी करण्याचा प्रस्ताव असल्याचे परदेशी यांनी सािंगतले.

पासपोर्ट कार्यालयातून सामान्य नागरीकांना माहिती देण्यात येत नाही. यामुळे एजंट लोकांची चांदी होते याला आळा घालण्यासाठी पासपोर्ट केंद्रात समुपदेशन कक्ष स्थापन करण्यात यावा अशी मागणी खासदार जावडेकर यांनी यावेळी केली.
सर्व्हरमध्ये फेरमार नाही
पासपोर्ट अर्जाचे ऑनलाईन सर्व्हर दिल्ली येथुन चालविण्यात येते तसेच त्याचे रिकव्हरी सर्व्हर चेन्नईला आहे यामुळे सर्व्हरमध्ये कोणत्याही प्रकारचा फेरमार करणे पुण्यातील एजंटाना शक्य नसल्याचे परदेशी यांनी स्पष्ट केले. तसेच पासपोर्ट कार्यालयातील एजंटस्चा बंदोबस्त करण्यासाठी पुण्यातील अधिकार्‍यांनी तत्काळ कठोर पावले उचलावीत असे आदेश त्यांनी दिला