पुणे, दि. 5 (प्रतिनिधी) – रूपी बँकेवर रिझर्व्ह बँकेने लादलेल्या निर्बंधांमुळे हजारो खातेदार त्यांच्या त्यांच्या व्यवहारात खचले आहेत. खातेदारंाचे कोटीच्या कोटी रुपये बँकेच्या खात्यामध्ये अडकले आहेत. या प्रकरणात दोषी असलेल्या संचालकांची संपत्ती जप्त करावी व त्यांच्यावर सहकार खात्याने गुन्हे नोंदवावेत, आदी मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी रूपी बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
रुपी बँकेच्या संचालकाविरोधात भाजपाची निदर्शने
आमदार गिरीश बापट व आमदार माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्त्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. सहकार खात्याने 2000 मध्ये असलेल्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल केले होते. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे त्यातील काही संचालक पुन्हा 2008 मध्ये बँकेवर निवडून आले. तत्कालीन व विद्यमान संचालकांपैकी दोषींवर गुन्हा दाखल करून बँकेचे ऑडिट करणार्या ऑडिटर्सची चौकशी करावी. कारण अ दर्जाची बँक एकदम ड दर्जात जाणार नाही. ती कशी गेली याची माहिती ऑडिटर देऊ शकतात. त्यामुळे त्यांची चौकशी करावी. तसेच थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
