नवी दिल्ली: भारतातील सोन्याची घटती मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घसरलेले भाव यांमुळे सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भारतातील दर आज १०० रुपयांहून घसरून २९ हजार ५०० रुपयांवर आला आहे. हा गेल्या १० महिन्यांतील नीचांकी भाव समजला जात आहे.

लग्नसराईचा मोसम सरल्याने भारतात सोन्याची मागणी घटली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याची मागणीही घटली आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री केल्याचे दिसून येत आहेत. यामुळे अमेरिकच्या बाजारात सोन्याचे भाव घटल्याने त्याचा परिणाम देशी
बाजारपेठेवर दिसून आला आहे.
औद्योगिक वापरासाठी चांदीची वाढती खरेदी झाल्याने प्रति किलोग्रॅम चांदीचा दर आज ५०० रुपयांनी वाढून तो ५१ हजार ७५० रुपयांवर पोहोचला आहे.