बंगळूरू- अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात बंगळूरचा मुंबईवर दणदणीत विजय मिळवला. बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सने मुंबई इंडियन्सवर धावांनी विजय मिळवत आयपीएलमधील पहिला विजयाची नोंद केली. त्याआधी ख्रिस गेलल्या नाबाद 92 धावांच्या खेळीच्या जोरावर बंगळूरुने मुंबईविरुद्धच्या सामन्यात पाच बाद 156 धावा केल्या होत्या.
आयपीएलच्या सहाव्या हंगामातील बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यात आलेल्या बंगळूरुच्या डावाची सुरुवात खराब झाली. बंगळूरूचे तीन गडी केवळ 31 धावांतच बाद झाले. मात्र आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलने अखेरच्या पाच षटकात केलेल्या जोरदार फलंदाजीमुळे बंगळूरुने पाच षटकात 56 धावा केल्या.
विजयासाठी 157 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईच्या डावाची सुरुवात रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकर यांनी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. मात्र मुरली कार्तिक (60 धावा) वगळता अन्य कोणत्याही फलंदाजास मोठी धावसंख्या उभा करता आली नाही. अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी 10 धावांची गरज होती. मात्र याच षटकात मुंबईचे दोन फलंदाज बाद झाले. मुंबईला 20 षटकात पाच बाद 154 धावा करता आल्या.