अमीषा करणार सिनेमाची निर्मिती

‘देसी मैजिक’ या सिनेमातून निर्मित क्षेत्रात बॉलीवुड अभिनेत्री अमीषा पटेल हिने नुकतेच पाऊल ठेवले आहे. आगामी काळात कलाकरासाठी बदल आवश्यक असून त्यामुळे त्यांना प्रगतीच्या संधी उपलब्ध होत असतात.

‘देसी मैजिक’ सिनेमासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रेस कॉन्फरन्स बोलताना अमीषा पटेल म्हणाली, ‘ प्रत्येकजन जीवनात बदलाच्या भूमिकेतून जात असतो. त्यामुळे प्रत्येकाला येणा-या काळानुसार बदलावे लागते. त्यामध्ये प्रत्येकाला बदल घडवून आणणे गरजेचे आहे.ज्यावेळी मी बॉलीवुडमध्ये पाऊल ठेवले त्यावेळी प्रत्येकजण उच्चशिक्षित अमीषा येथे काय करणार असा सवाल उपस्थित करीत होती. मात्र आता आगामी काळात सिनेमाची निर्मिती करण्याचे ठरविले आहे.’

‘देसी मैजिक’ या सिनेमात अमीषा सोबत अभिनेता जायद खान आणी रणधीर कपूर झळकणार आहेत. ‘रेस-२’ या सिनेमातून शेवटच्यावेळी पडद्यावर झळकलेल्या अमीषाने अर्थशास्त्र विषयात सुवर्णपदक प्राप्त केले आहे.