
मुंबई – अनेक भयावह रोगांवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक सायरस पुनावाला यांनी लस उपलब्ध करून दिल्या आहेत. ही संस्था आता कोरोनावरील प्रतिबंधक लसीचे संशोधन करण्यात अग्रणी आहे. त्याचबरोबर त्यांचे एवढ्या वर्षांचे योगदान लक्षात घेता राज्य सरकारने सायरस पुनावाला यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
मनसेने केली ‘सीरम’च्या पुनावालांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याची मागणी
असे भूषणावह कार्य करणाऱ्या सायरस पुनावाला यांना "महाराष्ट्र भूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे हि विनंती.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) December 30, 2020
यासंदर्भातील एक ट्विट मनसेचे ज्येष्ठ नेते आणि मुख्य प्रवक्ते बाळा नांदगावकर यांनी केले. त्यांनी ही मागणी या ट्विटच्या माध्यमातून केली आहे. सायरस पुनावाला हे सिरम इन्स्टिट्युट च्या माध्यमाने गेली अनेक दशके विविध रोगांवर लस उपलब्ध करून देत आहेत. या महामारीत सुद्धा पूर्ण जगाला त्यांनी लसीचे मोठया प्रमाणात उत्पादन करून मोठा दिलासा दिला आहे. पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे असेच आहे. असे भूषणावह कार्य करणाऱ्या सायरस पुनावाला यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे ही विनंती, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
