रशियन माफियाच्या भूमिकेत सैफ अली खान

सैफ अली खानचा आगामी चित्रपट ‘गन गोवा गॉन’ ही बॉलिवुडमधील पहिली जम्बो कॉमेडी आहे. ह्युमॅनिटी फिल्मस् आणि इरॉस इंटरनॅशनलची निर्मिती असलेल्या या चित्रपटात सैफ रशियन माफीया डॉन बोरीस हे पात्र रंगवत आहे.

एका फनी डॉनची ही कथा आहे. डॉन असला तरी तो मायाळू अशा स्वभावाचा आहे. कृष्णा डी.के.
आणि राज निदिमोरू यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘गो गोवा गॉन’मध्ये सैफसह कुणाल खेमू, वीर दास, आनंद तिवारी, पूजा गुप्ता प्रमुख भूमिकेत आहेत.

कॉमेडी, अ‍ॅक्शन आणि मैत्री असा तिहेरी धमाका यामध्ये बघायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर लवकरच लाँच होणार आहे.