अजय देवगनमुळे प्रभावित झाली तमन्ना

हिम्मतवाला सिनेमातून बॉलीवुड करियरचा आरंभ करीत असलेली दक्षिनात्य अभिनेत्री तमन्ना अभिनेता अजय देवगनच्या ईमानदारीमुळे खूपच प्रभावित झाली आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून अजयसाठी तमन्नाच्या ह्रदयात खास जागा आहे.

याबाबत बोलताना अभिनेत्री तमन्ना म्हणाली, ‘मी गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री अजय देवगनची प्रशसंक आहे. अजय सोबत काम केल्याने ह्रदयात खास जागा तयार झाली असून त्याशिवाय इज्जत सुद्धा वाढली आहे. अभिनया सोबतचा अजय खूप ईमानदार आहे. सोबत अभिनय करीत असताना मला खुप काही शिकायला मिळाले.’

तमन्नाचा आगामी काळात येत असलेला ‘हिम्मतवाला’ हा सिनेमा १९८३ मधील जीतेंद्र और श्रीदेवीच्या यश्स्वी सिनेमाचा नवीन भाग आहे. २९ मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तमन्नाला ‘हम दिल दे चुके सनम, ‘ओंकारा’ आणि ‘गोलमाल’ या सिनेमातील अजयचा अभिनय खुप आवडला आहे.