नवी दिल्ली दि.२३ – फार्मा कंपनी क्लाटिस ओट्सुकासह सरकारने शुक्रवारी थेट परकीय गुंतवणुकीच्या १२ प्रस्तावांना मान्यता दिली असल्याचे समजते. यातून २६०९ कोटी रूपयांची गुंतवणूक भारतात होणार आहे. फॉरिन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाचे इकॉनॉमिक अफेअर विभाग सचिव अरविंद मायाराम यांनी ही माहिती दिली असून ते म्हणाले की बोर्डाने डिकॅथलॉन स्पोर्टस इंडियाचा प्रस्तावही मान्य केला असून त्यातून ७०० कोटी रूपयांची थेट परदेशी गुंतवणूक होणार आहे.
फॉरिन इन्व्हेस्टमेंट बोर्डाने केलेल्या शिफारसींनुसार १३ फेब्रुवारीला एक बैठक झाली त्यात १२ प्रस्तावाला थेट परकीय गुंतवणुकीसाठी मान्यता देण्याबाबत चर्चा झाली होती. यातील सर्वात मोठा प्रस्ताव अहमदाबादच्या क्लाटिस ओटसुका लिमिटेडचा असून त्यातून १०५० कोटी रूपयांची गुंतवणुक केली जाणार आहे. मुंबईच्या ग्लानवेड पाईप सिस्टीममधून ८०० कोटींची गुंतवणूक होणार आहे. अन्य प्रस्तावात प्रमोद एसएएस फ्रान्स, फॉसिल इंडिया, ला क्रुसेट ट्रेडिंग, मेनारिना रौनक फार्मा, अल शुकुर कंपनी,एऑन होल्डिंग या प्रस्तावांचा समावेश आहे. मुंबई एरिका हेल्थकेअरचा प्रस्ताव मात्र नाकारला गेला असल्याचे समजते.