डेहराडून, दि. 19 त्तर भारतात महिलांची संख्या कमी झाल्याचा परिणाम आता निराळ्या पद्धतीतून उमटला आहे. पूर्वी भारतात बहुपत्निकत्त्व होते व आजही कायद्याला मान्य नसले तरी दोन बायका करण्याचा प्रकार अनेक ठिकाणी सुरु आहे. पण उत्तरेत बहुपतिकत्त्वाचा प्रघात सुरु झाला आहे. महाभारताप्रमाणे डेहेराडून नजीकच्या गावातील राजो नावाच्या एका महिलेला पाच पती आहेत ते पाचही सख्खे भाऊ आहेत. कायद्याच्या भूमिकेत तिचा विवाह फक्त गुड्डू नावाच्या तरुणाशी झाला. कागदोपत्री तोच तिचा पती आहे. पण त्या भागात बहुपतित्त्वाची प्रथाच असल्याने काही दिवसांनी गुड्डूचा भाऊ बैजू याच्याशी झाला. दुसर्या लग्नाच्या वेळेस सारा गोतावळा तर हजर होताच पण त्याचवेळी सार्या जातपंचायतीने पुढील तीनही भावांचे विवाह तिच्याची पक्के केले.
त्या भागातील अन्य बालविवाहाच्या प्रथा व हा विवाह याच्यात फरक येवढाच की राजो आणि दुसरा भाऊ बैजू यांच्या लग्नादिवशी असे ठरविण्यात आले की, त्यांचे धाकटे भाऊ संत राम, गोपाल आणि दिनेश यांची वये जशी जशी अठराच्या पुढे सरकतील त्या प्रमाणे त्यांचे विवाह राजोशी करायचे. या भागात येणारे पर्यटक आवर्जून राजो आणि तिच्या पाच पांडवांना भेटतात. सारे पर्यटक आश्चर्यचकित असतात पण ते कुटुंब मात्र नेहेमीसारखे वावरत असते. ‘ ज्या घरी दोन बायका असतात तेथे कोणाला अवघडल्यासारखे वाटत असते काय, असा त्यांचाच प्रतिप्रश्न असतो. राजोने तिचा असा अनुभव सांगितला की, तिला भेटायला येणार्या अशा पर्यटकामुळे प्रथम तिला फार अवघडल्यासारखे होत असे. आता आता काही वाटेनासे झाले आहे. आता त्या विस्तारित कुटुंबाला एक वर्षाचा मुलगाही आहे.
‘पण प्रथम जेंव्हा एकापेक्षा अधिक पती करण्याची कल्पना तुझ्या पुढे आली तेंव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती. तुझ्या मैत्रिणींची प्रतिक्रिया काय होती व शाळेतील अन्य मुलांची प्रतिक्रिया काय होती, अशा स्वरुपाचे शहरी प्रश्न जेंव्हा तिला विचारले जातात तेंव्हा तिचे उत्तर एकच असते की, संसाराच्या वाढत्या जबाबदार्यात यावर विचार करायलाही माझ्याकडे वेळ नव्हता कारण माझी आईही सख्या तीन भावांची पत्नी होती. अशा बहुपतित्वाचा एकच फायदा तिच्या मनावर ठसला आहे तो म्हणजे घरातील जमिनीच्या कधीही वाटण्या कराव्या लागणार नाहीत. राजोने असेही सांगितले की, माझ्या माहेरच्या गावाशेजारच्या अनेक गावात ही प्रथा आहे. दोनपेक्षा अधिक भावापैकी जर एकाद्याने नकार दिला तर तो त्याच्या वाटेने जाण्यास रिकामा असतो पण तो त्या जातीतून बहिष्कृत होतो. तिच्या बाळाचे बाबा कोण, असा प्रश्न पुढे आला तर काय असे जेंव्हा तिला विचारले गेले तेंव्हा तिने दिलेले उत्तर सर्वांना चकित करणारे होते. ती म्हणाली, ‘ माझ्या सासरच्या गावी किंवा माहेरच्या गावीही शेकडो ठिकाणी हीच प्रथा असताना कधीही ही समस्या आली नाही. पण आली तर पुढे काय असे विचारता ती म्हणाली, ‘मला डीएनए टेस्टची माहिती आहे.’