स्विस महिलेवर मध्य प्रदेशात सामुहिक बलात्‍कार

भोपाळ – मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यात स्वित्झर्लंडमधील एका महिलेवर सात जणांना सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

पीडित महिला स्वित्‍झर्लंडची आहे. ती पतीसोबत ओरछा येथून आग्‍य्राला जात होती. दोघेही सायकलने जवळपास 250 किलोमीटरचा प्रवास करीत होते. ते रात्री दतिया येथे मुक्कामी थांबले. रात्री काही जण काठ्या घेऊन त्‍यांच्‍याजवळ आले. दोघांनाही जबर मारहाण केली. त्‍यानंतर आळीपाळीने महिलेवर बलात्‍कार केला. तिला बेशुद्धावस्‍थेत रस्‍त्यावरच फेकून सर्वजण पसार झाले.

या प्रकरणी दातिया पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेला ग्वाल्हेरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.