चंदिगढ दि.१६ – हरियानातील सर्व ट्रेझरी कार्यालयने सायबर ट्रेझरीज बनविली जात असून त्यामुळे यापुढचे सर्व व्यवहार ऑनलाईन होणार असल्याचे अर्थ विभागाचे प्रमुख सचिव संजीव कौशल यांनी जाहीर केले आहे. पहिल्या मॉडेल ट्रेझरी चे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यामुळे सर्व ट्रेझरी कार्यालये पेपरलेस होणार आहेत शिवाय नागरिकांना घरूनच त्यांची ट्रेझरी कार्यालयातील कामे ऑनलाईन करता येणार असल्याचे हेलपाटे घालण्याची वेळ येणार नाही असेही ते म्हणाले.
हरियानात सायबर ट्रेझरी कार्यालये
ट्रेझरी कार्यालयने सायबर ट्रेझरी करणारे हरियाना हे देशातले पहिले राज्य आहे. या कार्यालयात इलेक्ट्रोनिक पेमेंट सिस्टीमची सुविधा करण्यात आली असून पेन्शनसाठी स्वतंत्र कौंटर देण्यात आला आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठीच सोय झाली आहे. याचा दुसरा फायदा म्हणजे पुढील नियोजन करताना किवा योजना आखताना जलद व अचूक निर्णय घेणे शक्य होणार आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्याची कार्यतप्तरता वाढणार असून सर्वच कारभार पारदर्शी पद्धतीने होणार आहे असेही कौशल यांनी सांगितले. एक वर्षभराच्या अवधीत सर्व ट्रेझरी कार्यालये सायबर ट्रेझरी होणार आहेत तसेच या कार्यालयातून सीसीटिव्हीही बसविले जाणार आहेत असेही ते म्हणाले.
