कोलकत्त्यात सातशे झोपड्या जळून खाक

कोलकाता – शहरापासून काही अंतरावर असलेल्या संतोषपूर महेशतळा भागात लागलेल्या आगीत ७०० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. यामुळे हजारो नागरिक बेघर झाले आहेत. ही घटना शनिवारी पहाटे घडली. या आगीमध्ये कसलीच जीवितहानी झाले नाही, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले.

संतोषपूर महेशतळा भागात असलेल्या झोपद्याना शनिवारी पाहटे अचानक आग लागली. आग भडकत गेल्याने आगीच्या भक्षस्थानी एक-एक झोपड्या पडत होत्या. काही वेळातच आगीने रोद्र्रूप धारण केल्याने ७०० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. घटनास्थळी सात अग्निशमन दलाचे बंब रवाना करण्यात आले. मात्र रेल्वेफाटक ओलांडून झोपडपट्टी भागात गाड्या जात नसल्याने आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

गेल्या महिन्यातही कोलकात्यातील सिलडाह कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीत १८ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर ही घटना घडल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वितहानी झाली आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर झाले आहेत.